Pune News : ‘मिलाप करंडक 2023’ पुरस्कार नगीनदास खंडवाल व मामासाहेब मोहोळ महाविद्यालयांनी पटकावला

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्चा, युवा वॉरीयर्सच्या वतीने ( Pune News )आयोजित ‘मिलाप करंडक 2023’, आंतर महाविद्यालयीन एकल / समूह नृत्य स्पर्धेचे विजेतेपद एकल विभागात अजय शर्मा (नगीनदास खंडवाल महाविद्यालय) व समूह नृत्य विभागात क्वॉयझिटीक किग (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय) यांनी पटकावले.

 

स्पर्धेचे बक्षिस वितरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या सोहळ्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, अजय खेडेकर, दिपक पोटे, गणेश घोष, पुनीत जोशी, संयोजक सुशील मेंगडे, अमृत मारणे, प्रा. सचिन जायभाये, गणेश कुटे, भैरवी वाघ, सुजित थिटे, प्रिया पवार, अक्षय नलावडे आदी( Pune News ) उपस्थित होते.

Pimpri News : आरोग्य मित्र फाउंडेशनतर्फे ‘ आरोग्य कट्टा ‘सत्राचे आयोजन

उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे दिवसभर रंगलेल्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या. तरुणाईच्या जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत वैयक्तिक गटात जणांनी 55 , तर सांघिक गटात 15 गटांनी भाग घेतला होता. पारंपारिक कथक, लावणीपासून पाश्चात्य नृत्यातील ब्रेक डान्स आदी प्रकारात विद्यार्थ्यांनी दाखवलेले नृत्यकौशल्य  वाखाणण्याजोगे होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे  सरचिटणीस ओंकार केदारी आणि चिटणीस अजिंक्य साळुंखे यांनी परिश्रम घेतले. आर जे बंड्या यांनी सूत्र संचालन केले व ओंकार केदारी यांनी आभार ( Pune News )मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.