एमपीसी न्यूज -आरोग्य मित्र फाउंडेशन, एम.पी. सी.न्यूज, मनाची व्यायाम शाळा व सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ आरोग्य कट्टा ‘ ही मालिका दर महिन्याला (Pimpri News) आयोजित करण्यात येत आहे.याचे पहिले सत्र सायन्स पार्क चिंचवड येथे शनिवार 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या पहिल्या सत्राचा विषय महाविद्यालय विद्यार्थी संदर्भातील आहे.
ताण-तणावाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सध्या आपल्या देशातील लोकांच्या तणावाची पातळी (Stress Level) अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराची पातळी पण खूप वाढली आहे, ज्यामध्ये केवळ प्रौढच नव्हे तर मुले देखील याला बळी पडत आहेत. सेंटर ऑफ हीलिंग (TCOH) च्या संशोधनानुसार, 74 टक्के भारतीयांनी तणावाविषयी चर्चा केली आहे. तर 88 टक्के लोकांनी एंग्जाइटीची चिंता व्यक्त केली.
Pune News : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार
करिअर आणि परीक्षा हे भारतातील किशोरवयीन आणि मुलांच्या तणावाचे कारण आहेत. तर प्रौढांमध्ये खराब संबंध आणि नैराश्य हे कारण असल्याचे आढळले आहे. थोडक्यात ह्या ताणतणावचा सामना समाजातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कॉर्पोरेट क्षेत्र, आय टी क्षेत्र, वैद्यकीय सेवा, पोलीस कर्मचारी अगदी सफाई कर्मचारी यांना करावा लागतो आहे. यासाठी वेळीच मार्गदर्शन किंवा समुपदेशन मिळाले तर पुढील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. यासाठी आरोग्य मित्र फाउंडेशन तर्फे ‘ आरोग्य कट्टा ‘ ही मालिका आयोजित करण्यात आली आहे.
तरी आपल्या शहराचे आरोग्य चांगले करण्यासाठी या सत्रात सहभाग घ्यावा असे आव्हान आरोग्य मित्र फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.