Chandrakant Patil : पोलिसांचे निलंबन नको, बदली करा; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया; तर एक पत्रकार ताब्यात

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शाहीफेक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील 3 अधिकारी व 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यावर चंद्रकांत पाटील यांनी निलंबन नको त्यांची बदली करा अशी प्रतिक्रिया दिली आहे. या शिवाय त्यांनी या कटात पत्रकारही सामील असण्याचा मोठा खुलासा केला आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक प्रकरणानंतर आता विरोधकांना मोठी प्रतिक्रिया देऊन एकतर्फी इशारा दिला आहे. या सगळ्या गोष्टीची लिंक सापडली आहे. यामध्ये पत्रकार सुद्धा आहेत. प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराची  रात्री चौकशी करून त्याला सकाळी ताब्यात घेण्यात आयले असल्याचीही त्यांनी माहिती दिली. हा एक कट होता, या कटाचा लवकरच उलगडा होईल. आणि संपूर्ण तपास पूर्ण होईल. सगळे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. कोण कुणाला मेल केले गेले? हे सगळ माहिती आहे. मी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली, आहे की अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करू नका. त्यांचा संसार रस्त्यावर येईल.

ते म्हणाले कि मला काही होणार नाही. पण, मोठी संपत्तीवालो तुमचे काय? पुढे ते म्हणाले, कि आम्ही औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला. भीक आणि भिकारी यामध्ये मोठा फरक आहे. तरीही माझ्यावर भ्याड हल्ला झाला. या प्रकरणाची आता सविस्तर चौकशी होईल.

बाबासाहेबांचे संविधान पायदळी तुडवले – Chandrakant Patil

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत, त्यांचा अवमान मी करणारच नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यासाठी मी संवाद यात्रा काढली होती. माझ्या मनात बाबासाहेबांविषयी अनादर असणे शक्य नाही. तुम्ही काल जे केलं, त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचे आदर्श आणि संविधान पायदळी तुडवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.