Charholi : घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज –  महिलेचा पाठलाग करत, मला उत्तर का देत नाही म्हणत थेट महिलेच्या घरात घुसून  विनयभंग केल्या प्रकरणी एकावर  दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17) चऱ्होली येथे (Charholi) घडला आहे.

Pimpri : फोन उचलला नाही म्हणून कथीत भाईने केले तरुणावर कोयत्याने वार

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून गोरख खंडू पठारे  (रा. चऱ्होली) याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा थेट फिर्यादीच्या घरात घसला व त्याने मी बरेच दिवस तुझा पाठलाग करत आहे तरी तू मला उत्तर देत नाही. दोन दिवसात मला तुझे म्हणणे सांग म्हणत फिर्यादीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले तसेच घरच्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून दिघी पोलीस पुढील तपास करत (Charholi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.