Charholi News: भारत सरकारच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अशासकीय सदस्यपदी सागर जाधव

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अशासकीय सदस्यपदी पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक सागर जाधव यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत असणार आहे.

सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग खात्याचे सचिव सुधीर गर्ग यांनी ही नियुक्ती केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या च-होली फाटा येथील सागर जाधव हे सामान्य कुटुंबातील उद्योजक आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वडिलांच्या पारंपरिक उद्योगांमध्ये मदत करू लागले.

त्याचवेळी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक व मदतनीस म्हणून त्यांनी काम केले. वेळोवेळी नवउद्योजकांसाठी शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची व कामांना वाचा फोडून ते कामे मार्गी लावले.

या कामाची दखल घेत केंद्र सरकारने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अशासकीय सदस्यपदी जाधव यांची नियुक्ती केली आहे. निवडीबद्दल जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.