Chemists Association : परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे; केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे यांची मागणी

एमपीसी न्यूज – राज्य अन्न व औषध प्रशासनाने (Chemists Association) बाहेरील राज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे यांनी केली आहे.

नियंत्रण ठेवले तर अनेक गैरप्रकाराला आळा घालता येईल. ऑनलाईन औषधविक्रीला कोणतीही परवानगी नसताना आज मोठया प्रमाणावर ऑनलाईन औषधविक्री होत आहे. परराज्यातून येणारी औषधे कोणत्या प्रकारची आहेत? याबद्दल आपणांस काही कल्पना नसते ती योग्य आहेत की अयोग्य, गुणवत्ता , मूळ आहेत की नक्कल, गर्भपाताची औषधे, नशेचे औषधे, झोपेच्या गोळ्या या सर्व थेट रूग्नाच्या हातात पडतात ते ही मोठ्या सवलतीच्या दरामध्ये. विविध प्रलोभने दाखवून रूग्णास बळी पाडतात.

तिथे फार्मसिस्ट उपस्थित आहे, की नाही हा विषय गौणच मानला जातो. याविरूद्ध स्थानिक औषधविक्रेता हा फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये सर्व नियंमांचे पालन करून औषध विक्री करीत आहे. या परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बाजारांमध्ये परारज्यातून येणारी अनेक औषधे ही बनावटीची असू शकतात. डिजिटल इंडीयामध्ये अनाधिकृत ऑनलाईन औषध विक्री सोईस्कर रित्या रूग्णास कधी ऑफलाईन करेल हे सांगता येत नाही.

PCMC : न्यू जिजामाता रुग्णालयातील 148 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अन्न व औषध प्रशासनाने योग्य ते लक्ष घालून परराज्यातून (Chemists Association) येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवून होणारी हानी टाळावी, अशी विनंती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.