Karve Road : हॉर्न का वाजवता, जाब विचारल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण

एमपीसी न्यूज : विनाकारण हॉर्न का वाजवता? असा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका भाजी विक्रेत्याला जबर मारहाण (Karve Road) केली. कर्वे रोडवरील नेहरू वसाहत चौकामध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेश रामदास पवार (वय 49) यांनी तक्रार दिली असून आरोपी आकाश संजय जवळकर (वय 28) आणि सागर रवींद्र शेडगे (वय 30) यांच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chemists Association : परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे; केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे यांची मागणी

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे एरंडवणे परिसरात (Karve Road) भाजी विक्री करत असतात. सोमवारी रात्री ते आपल्या स्टॉलवर असताना आरोपींनी दुचाकीवरून जाताना विनाकारण हॉर्न वाजवला. त्यावर फिर्यादी यांनी विनाकारण हॉर्न का वाजवता अशी विचारणा केली. याचा राग आल्याने दोघांनी मिळून फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. पोलीस हवालदार पिल्ले अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.