Lonikand : निकृष्ट दर्जाच्या केबलची विक्री करणाऱ्या दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : निकृष्ट दर्जाच्या (Lonikand) केबलची विक्री केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना केबल जादा गेजची आहे असे दाखवून कमी गेजची केबल दिली. वाघोली येथील डायमंड हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि सद्गुरु इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर या दोन दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वाघोलीतील दोन दुकानांमध्ये जॉन्सन केबल इलेक्ट्रिक आणि सोलर कॅब इलेक्ट्रिकची अंडरग्राउंड केबल जास्त गेजची असल्याचे भासवून ग्राहकांना कमी दर्जा असणाऱ्या गेजची केबल आरोपींनी विक्री केली होती. यामुळे ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही केबल विक्री करताना आढळले.

Housing Society : कंपोस्टिंग युनिट करणा-या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात 50 टक्के सूट द्या, आपची मागणी

लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल (Lonikand) केला असून पोलीस उपनिरीक्षक जायभाय अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.