Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवाराची कार्यकारिणी तीन महिन्यात गठित करावी

देवस्थान विभागाच्या आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – देशभरातील जैन छाजेड समाजाची अग्रणी संस्था म्हणून ओळखल्या ( Chhajed Parivar Mandal ) जाणाऱ्या अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेचे कार्यकारी मंडळ तीन महिन्यात गठित करावी असा आदेश देवस्थान विभागाचे आयुक्त प्रज्ञा केवलरमानी यांनी दिला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन कार्यकारिणी गठित करणा-यांना मोठा दणका बसला आहे. हे प्रकरण ‘एमपीसी न्यूज’ने उघडकीस आणले होते.

अ. भा. छाजेड परिवार मंडळाच्या अध्यक्ष निवडीचा वाद देवस्थान समितीकडे गेला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे किशोरचंद छाजेडच अध्यक्ष झाले होते. कोणत्याही नियमात हे बसत नाही. घटनेच्या विरुद्ध प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप घेत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी करत ताराचंद तगराज मेहता आणि पारसमल बी छाजेड यांनी जोधपूर येथील देवस्थान समितीकडे तक्रार केली होती. त्यावर सुनावणी चालू आहे.

निवडणूक अधिका-याला अध्यक्ष बनण्याची घटनेत कोणतीही तरतूद नाही. याबाबत केलेला खुलासा योग्य नाही. निवडणूक अधिकारी अध्यक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे किशोरचंद छाजेड यांची नियुक्ती रद्द करावी. खासगी असल्याप्रमाणे ट्रस्टवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सहाय्यक निवडणूक अधिका-याला निवडणुकीत सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे अशोकभाई मेहता यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. अमृतलाल छाजेड यांचा राजानीमा ‘रेकॉर्ड’वर उपलब्ध नाही. ट्रस्टच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवार बनू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Chinchwad : कौटुंबिक वादातून चिंचवडमध्ये एकावर कोयत्याने वार

दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर  देवस्थान विभागाचे आयुक्त प्रज्ञा केवलरमानी यांनी आदेश ( Chhajed Parivar Mandal ) दिला. पूर्वीच्या कार्यसमितीची बैठक बोलवावी. संघटनेच्या घटनेनुसार निवडणूक निर्णय अधिका-याची नियुक्ती करावी. त्यांच्यामाध्यमातून चार पदाधिका-यांची नियुक्ती करावी. त्यात अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष,  महामंत्री, कोषाध्यक्षाची नियुक्ती करावी. त्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवावी.

समिती गठणाची कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करावी. निवडणुकीच्या पर्यवेक्षणासाठी दिपक दवे यांची  नियुक्ती केली आहे. त्यांनी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडावी. याबाबतची अंतिम सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी सहाय्यक आयुक्त देवस्थान जोथपूर यांच्यासमोर होणार आहे. त्यासाठी वादी आणि प्रतिवादी यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व भ्रष्ट कारभार होणार उघड?

मंडळात बेकायदेशीर, नियमांना डावलून कामकाज केले जात होते. अतिशय मनमानी पद्धतीने कामकाज केले जाते. पैशांचा दुरुउपयोग केला जात आहे. कार्यकारणी मंडळात नसतानाही  अनेकांना विविध समित्यांवर घेतले आहे. एकत्रितपणे, संगनमताने भ्रष्टाचार करण्यासाठीच समित्यांमध्ये घेतले जात आहे.

चुकीच्या कामाविरोधात बोलणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी, चुकांवर पांघरूण ( Chhajed Parivar Mandal ) घालण्यासाठीच मंडळात नसतानाही विविध समित्यांमध्ये घेतले जात असल्याचा आरोप सभासदांकडून केला जात होता. आता हा सर्व भ्रष्ट कारभार उघडकीस येईल असा विश्वास सभासदांकडून व्यक्त केला जात आहे.

घटनेचे झाले होते उल्लंघन

निवडणूक कायदे आणि नियमांचे उल्लंघन केले असावे. यामध्ये धमकावणे, मतदान प्रक्रियेत फेरफार करणे आणि निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे यांचा समावेश आहे. परंतु ते इतकेच मर्यादित नाही. अशा प्रकारच्या उल्लंघनांमुळे आपला समाज ज्या लोकशाही तत्त्वांवर बांधला गेला आहे, त्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.

घटनेच्या कलम-6(B)(3)(4)(d) चे पालन केले गेले नाही. कलम-6 (ब) (3) “मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार यांची निवडणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून केली जाईल. ही निवडणूक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक अधिकाऱ्यामार्फत घेतली जाईल.

याचे पूर्णपणे पालन न केल्यामुळे फॉर्म-8 नाकारण्यात यावा. घटनेनुसार निवडणूक अधिकारी स्वतः निवडणुकीत उमेदवार होऊ शकत नाही, या फॉर्म-8 मध्ये निवडणूक अधिकारी स्वतः ट्रस्टचा अध्यक्ष आहे हे व्यवहार्य नाही. पूर्णपणे घटनेचे उल्लंघन झाले होते, असेही सभासदांनी म्हटले ( Chhajed Parivar Mandal ) आहे.

https://www.youtube.com/watch?v=0YsdDM7gFRQ&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.