Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक  

एमपीसी न्यूज – कालच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल ( Mumbai ) नार्वेकर यांच्या कार्यपध्दती व दिरंगाईबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये आज वर्षा बंगल्यावर बंद दाराआड गुप्त बैठक पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीत अतिशय महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्याने दोन्ही नेत्यांनी सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवल्याचे कळते आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. लोकसभेच्या ( Mumbai ) निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना आमदार अपात्रता प्रकरण निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सुनावले आहे.

Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवाराची कार्यकारिणी तीन महिन्यात गठित करावी

नाहीतर आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या याचिकांचं वेळापत्रक जाहीर करणं बंधनकारक असणार आहे.  दरम्यान आज नार्वेकरांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. “सगळा महाराष्ट्र बघतोय. यांची जाण्याची वेळ झालीय. आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ, त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं परवावर ढकललं गेलं.

पण तिरडी तयार आहे. फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जीवंत ठेवलेलं आहे.

व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.  तथापि या पार्शभूमीवर राज्याचे राजकारण कोणते नवीन वळण घेते,ते पाहणे महत्वाचे ठरणार ( Mumbai ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.