Chhajed Parivar Mandal : 11 प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; अ. भा. छाजेड परिवाराच्या सदस्यांचा अध्यक्षांना इशारा

एमपीसी न्यूज – भुवाल वाटिका, भुवाल माताजी मंदिर या दोन ठिकाणांची मूळ कागदपत्रे,(Chhajed Parivar Mandal) भाडेपट्टा, नोंदणी प्रत आणि इतर कोणतीही कागदपत्रे कुठे आहेत याची माहिती द्यावी. कार्यालयातून पैसे चोरणा-या व्यक्तीवर कोणतीही कारवाई का केली नाही.

कार्याध्यक्षांशी चर्चा न करता विश्वस्त मंडळाची समिती का बनवली, अशी प्रश्नांची सरबत्ती करत उत्तरे देण्याची  जोरकसपणे मागणी अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेच्या सभासदांनी केली आहे. तसेच गो-शाळेला विरोध करणे चुकीचे असल्याचेही सभासदांनी म्हटले आहे.

याबाबत सभासदांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी (Chhajed Parivar Mandal)म्हणून काम करणारे किशोरचंद छाजेडच अध्यक्ष झाले होते. कोणत्याही नियमात हे बसत नाही. आता छाजेड यांच्याकडून अंधारात चूक मान्य केली जात आहे.

Pune: पुण्यात सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, दोन महिलांना स्वारगेट बस स्थानकावरून अटक

चक्रव्यूहात अडकल्याचे सांगत आहेत. पण, त्यांना आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बरडिया कुटुंबाची आरती किंवा इतर कोणत्याही प्रसादासाठी दिलेली परवानगी रद्द करावी. ज्या व्यक्तीवर छाजेड परिवाराच्या सुनेचा विनयभंग केल्याचा गुन्हा आणि आरोप आहे. त्या व्यक्तीला विश्वस्त मंडळातून काढून टाकण्यात यावे. काही वर्षांपूर्वी नवरात्रीच्या काळात वाटिका व्यवस्थापक गुणवंत यांनी सांचोर येथील लोकांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांच्यावर कारवाई करावी.

काही वर्षांपूर्वी नवरात्रीच्या काळात बिरामी कार्यालयातून पैसे चोरीला गेले होते. पैसे चोरणा-यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्याचे कारण काय, त्यांनी पैसे दिले का, याची माहिती सर्वांना द्यावी. भुवाल वाटिकेत एक दगड बसवला होता, ज्यावर माजी अध्यक्षांचे नाव लिहिले होते, हे योग्य आहे का? या प्रकरणाला सोशल मीडियावर लोकांचा जोरदार विरोध झाला. विश्वस्त मंडळाची समिती बनवली, ती कार्याध्यक्षांशी सल्लामसलत न करता का बनवली, त्यांना सोबत का घेण्यात आले नाही, त्याचे कारण काय, याची सर्वांना माहिती द्यावी.

13 फेब्रुवारी 2022 ला तुमच्या कमिटीची बैठक झाली. त्यानंतर कार्यध्यक्ष अशोक यांनी  तुमच्या मोबाईल ग्रुपमध्ये प्रश्न विचारला होता आणि तुम्ही त्याचे उत्तर दिले. त्यात तुम्ही लिहिले होते की मी तुमच्यासोबत संस्थेचे काम करू शकत नाही.

 

यापुढे कोणत्याही विश्वस्त बैठकीला हजर राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करू शकता, हे शोभा देत आहे का, आजपर्यंत कोणत्याही माजी अध्यक्षांनी असे कार्याध्यक्षाला असे म्हटले नाही. तुमच्याप्रमाणेच कार्याध्यक्षही जनतेने निवडले आहेत.  अध्यक्ष प्रत्येकांशी बोलले फोन रेकॉर्ड करत आहेत . आणि ते रेकॉर्डिंग लोकांना पाठवत आहेत. हे शोभा देते का, असे चुकीचे काम केल्यास लोक तुमच्याशी बोलायला  घाबरतील. भुवळ वाटिकेतील कर्मचाऱ्यांकडून वारंवार लोकांशी गैरवर्तन केले जाते. त्यांच्यावर कारवाई न करून तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात.  त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल सभासदांनी केला आहे.

अध्यक्ष तुम्ही नेहमी म्हणता की आपण सर्व भाऊ आहोत. परंतु, कार्यध्यक्ष असलेल्या अशोक यांच्याशी तुम्ही नेहमीच भेदभाव करत आलात. बाहेरून गुंड बोलावून त्यांच्यावर, त्यांच्या मुलावर आणि पत्नीवर हल्ला केला. बिरामीतील फलकावरील त्यांचे नाव हटविले.

 

नवरात्रीच्या मासिकात त्यांचे नावही लिहिले नाही. भुवल माताजी यांचे मोठ्या अक्षरात नाव छापले आहे. हे शोभा देते का, एवढे  गर्विष्ठ राहणे, छाजेड बांधवांना सोबत न घेणे हे चुकीते आहे. आम्ही तुमचा धिक्कार करतो. तुम्ही खुर्चीवर बसल्यापासून पनवती लागली आहे. सातत्याने काही ना काही घटना घडत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.