Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवार मंडळाच्या खर्चावर देवस्थान समितीकडून निर्बंध

एमपीसी न्यूज – देशभरातील जैन छाजेड समाजाची अग्रणी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Chhajed Parivar Mandal )अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेच्या कार्यकारी मंडळाला खर्च करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आम्हाला विचारल्याशिवाय कोणताही मोठा खर्च मंडळाला करता येणार नसल्याचा आदेश जोधपूर येथील देवस्थान समितीने दिला आहे.

अ. भा. छाजेड परिवार मंडळाच्या अध्यक्ष निवडीचा वाद देवस्थान समितीकडे गेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे किशोरचंद छाजेडच अध्यक्ष झाले आहेत. कोणत्याही नियमात हे बसत नाही. घटनेच्या विरुद्ध प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप घेत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी करत ताराचंद तगराज मेहता आणि पारसमल बी छाजेड यांनी जोधपूर येथील देवस्थान समितीकडे तक्रार केली होती. त्यावर 16 जून रोजी सुनावणी झाली.

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर देवस्थान समितीने कार्यकारी मंडळाला खर्च करण्यास निर्बंध घातले. समितीला विचारल्याशिवाय कोणताही खर्च करु नये, असे आदेश दिले. त्याचबरोबर पुढील सुनावणी 5 जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले. या सुनावणीत अंतिम निर्णय दिला जाईल, असे देवस्थान समितीने सांगितले.

Pune : प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भ्रष्टाचारासाठी महेंद्र डी. मेहतांची नियुक्ती?

महेंद्र डी. मेहता हे कार्यकारी मंडळात नाहीत. असे असतानाही त्यांना भोजन व्यवस्था समिती, भुवाल वाटिका व्यवस्थापन समितीत घेतले आहे. कार्यकारी मंडळात नसतानाही मेहता त्यांना कशाच्या आधारे विविध समित्यांवर घेतले आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांचा समितीत समावेश करुन देवस्थान समितीची फसवणूक केली जात असल्याची तक्रार सभासदांकडून केली जात आहे. भ्रष्टाचार वाढविण्यासाठी तर त्यांचा विविध समित्यांमध्ये समावेश केला नाही ना, अशी शंका सभासदांकडून उपस्थित केली जात आहे.

अनेकांना समितीत घेतले?

मंडळात बेकायदेशीर, नियमांना डावलून कामकाज केले जात आहे. अतिशय मनमानी पद्धतीने कामकाज केले जाते. पैशांचा दुरुपयोग केला जात आहे. कार्यकारणी मंडळात नसतानाही अनेकांना विविध समित्यांवर घेतले आहे. एकत्रितपणे, संगनमताने भ्रष्टाचार करण्यासाठीच समित्यांमध्ये घेतले जात आहे. चुकीच्या कामाविरोधात बोलणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी, चुकांवर पांघरूण घालण्यासाठीच मंडळात नसतानाही विविध समित्यांमध्ये घेतले जात असल्याचा आरोप सभासदांकडून केला जात आहे.

स्वतःच्या नावासाठी सभासदांची दिशाभूल!

भुवाल वाटिका इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीचे डिझाईन, सर्व कामकाज अमृतलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याची कोनशिला (बोर्ड) इमारतीला लावली आहे. अमृतलाल जैन हे अभियंता नाहीत, आर्किटेक्ट नाहीत असे असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कसे काम करण्यात आले आहे. स्वतःच्या नावासाठी सभासदांची दिशाभूल केली जात आहे.  देवीचीही फसवणूक केली जात असल्याचा आरोप सभासदांकडून केला जात आहे.

घटनेचे उल्लंघन?

निवडणूक कायदे आणि नियमांचे उल्लंघन केले असावे. यामध्ये धमकावणे, मतदान प्रक्रियेत फेरफार करणे आणि निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे यांचा समावेश आहे. परंतु ते इतकेच मर्यादित नाही. अशा प्रकारच्या उल्लंघनांमुळे आपला समाज ज्या लोकशाही तत्त्वांवर बांधला गेला आहे, त्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.

घटनेच्या कलम-6(B)(3)(4)(d) चे पालन केले गेले नाही. कलम-6 (ब) (3) “मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार यांची निवडणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून केली जाईल. ही निवडणूक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक अधिकाऱ्यामार्फत घेतली जाईल.

याचे पूर्णपणे पालन न केल्यामुळे फॉर्म-8 नाकारण्यात यावा. घटनेनुसार निवडणूक अधिकारी स्वतः निवडणुकीत उमेदवार होऊ शकत नाही, या फॉर्म-8 मध्ये निवडणूक अधिकारी स्वतः ट्रस्टचा अध्यक्ष आहे हे व्यवहार्य नाही, असेही सभासदांनी म्हटले (Chhajed Parivar Mandal )आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.