Chikhali : उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून मंगळसूत्र चोरले

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजा वाटे ( Chikhali) घरात घुसून घरातील मंगळसूत्र चोरीला गेले आहे. ही घटना सोमवार दि.8 ते मंगळवार दि.9 या कालावधीत चिखलीतील भीमशक्ती नगर येथे घडली आहे.

या प्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असता चोराने घरात घुसून घरातील कपाटातून 57 हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरून नेले आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस चोराचा शोध घेत ( Chikhali) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.