Dighi : विवाहितेचा पाठलाग करून  त्रास देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाठलाग करून व फोनवरून सतत त्रास देत बदनामीची धमकी दिल्या ( Dighi ) प्रकरणी एका विरोधात दिली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार 13 जून 2023 व 5 जानेवारी 2024 या कालावधीत दिघी येथे घडला.

याप्रकरणी महिलेने देखील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी अमर कुंभार (रा. ढोकी उस्मानाबाद)  याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 Chinchwad : पीसीसीओईचे पारिठेवाडीत श्रम संस्कार शिबिर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने पीडितेच्या मुलीचा हात धरला या एली फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपीने मला टाळू नको,माझे फोन का उचलत नाही.मला प्रतिसाद दिला नाही तर तुझी बदनामी करेन व तुझ्या मुलीला मरेन अशी धमकी दिली.

पुढे आरोपी त्रास देत असल्याने पिडीतेने पतीला या बाबत सांगितले. पीडितेच्या पती ने आरोपीला 5 जानेवारी रोजी फोन केला असता शिवीगाळ करत बायकोच्या बदनामीची धमकी दिली यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Dighi ) आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.