Khed : रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला जोरदार धडक (Khed) दिल्याने दुचाकीस्वाराचा जागेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 जानेवारी रोजी खेड येथील सावरदरी येथे घडला आहे.

भूषण संजय बोरसे (वय 26, रा. खालुंब्रे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुभाष कांतीलाल पवार यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मयत भूषण बोरसे याच्यावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड मधील ‘या’ दोघांना विशेष आमंत्रण

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यात दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी सावरदरी येथील वजन काट्या जवळ गाडीवरील नियंत्रण (Khed) सुटल्याने दुचाकी थेट रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली यात त्याचा मृत्यू झाला. महाळुंगे पोलिसांनी या अपघाताची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.