Chikhali News: संतपीठात सहावी, सातवीचे वर्ग सुरू होणार; 25 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Chikhali News) संचलित जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये नर्सरी, ज्युनियर के.जी, सिनियर के.जी, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी या वर्गासाठी प्रवेशासाठी अर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

यंदा संतपीठात सहावी व सातवीचे वर्ग सुरु करण्यात येणार असून प्रवेशासाठी 25 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे सचिव संजय नाईकडे यांनी केले आहे. तसेच नर्सरी ते सातवीपर्यंत 687 विद्यार्थी संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. चिखली, पाटीलनगर येथे पालिकेच्या वतीने संतपीठाची उभारणी करण्यात आली आहे. संत पीठात केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसार अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन व अध्यापन प्रणाली इंग्रजी माध्यमातून आहे. तसेच भारतीय संत साहित्य आध्यात्मिक व सांस्कृतिक अभ्यासक्रमाची जोड असणार आहे.

संत पीठात शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी (Chikhali News) नर्सरीसाठी 160, ज्युनियर के.जीसाठी 90, सिनियर के.जीसाठी 90, इयत्ता पहिलीसाठी 88, दुसरीसाठी 80, तिसरीसाठी 40, चौथीसाठी 40, पाचवीसाठी 52, सहावीसाठी 7 व सातवीच्या वर्गासाठी 40 विद्यार्थी संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच ज्या वर्गाच्या क्षमतेपेक्षा प्रवेश अर्जाची मागणी जास्त असेल त्याच वर्गाचे प्रवेश अर्ज निश्‍चित करण्यासाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात येणार आहे.

Pune : हिंदूवर होणारे आघात थांबवण्याची आवश्यकता – सुनील घनवट

संतपीठ प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम चौकशी फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे. फॉर्म जमा करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. तसेच आर.टी.ई च्या नियमानुसार नर्सरी वर्गासाठी आरक्षण लागू आहे. शाळेमध्ये प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पूर्व प्राथमिक वर्गांसाठी 20 हजार, इयत्ता पहिली ते तिसरी वर्गासाठी 27 हजार, इयत्ता चौथी ते पाचवी वर्गासाठी 32 हजार ठरविण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थांसाठी 32 तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थांसाठी 35 हजार रूपये शैक्षणिक शुल्क आकारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.