Pune : हिंदूवर होणारे आघात थांबवण्याची आवश्यकता – सुनील घनवट

एमपीसी न्यूज – सद्यस्थितीत हिंदू धर्मावर (Pune) लव्ह जिहाद, हलाल जिहाद गो हत्या, मंदिराचे सरकारीकरण, धर्मांतरण आदी विविध आघात होत आहेत. केवळ राष्ट्रीय पातळीवर नाही, तर गावपातळीवर सुद्धा हे गट सक्रीय आहेत. म्हणूनच हिंदूंवर होणारे आघात संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवारी (दि.8) कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या भक्ती डाफळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

PCMC: लेखा अधिकारी, लेखा परीक्षकांचा अभिप्राय घेऊनच विषयपत्र सादर करा; आयुक्तांचा आदेश

सभेचा प्रारंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलन करून (Pune) आणि वेदमंत्र पठणाने झाला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. या सभेचे सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.