Chikhali News : वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज – सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी (Chikhali News) संचलित श्री. शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मोरेवस्ती, चिखली या शाळेच्या प्रांगणात ‘वार्षिक क्रीडा महोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.

विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यात विद्यार्थ्यांनी झेंडा नाचवणे याचेही सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व मशालीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव शिरसाट हे होते. पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस उपस्थित होते.

Nigdi News : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तीन एकांकिकांचा महोत्सव

उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व नंतर क्रीडा मशालीची फेरी काढून क्रीडा मैदानाचे पूजन करून इ. 2 री व 3 री या संघाचा खेळ सुरू करण्यात आला. ‘वार्षिक क्रीडा महोत्सव’ कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रशासकीय प्रमुख व शिवसेना महिला संघटक जान्हवी पवार, पांडुरंग साने, यश साने कार्यक्रमसाठी उपस्थित होते.

तसेच विद्यार्थ्यांना ‘वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी’ पाहुण्यांनी प्रोत्साहन (Chikhali News) दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराव शिरसाट यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रीकांत किर्तीकर यांनी आभार ठाकरे सर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.