Chikhali News: 850 खाटांचे नियोजित रुग्णालय चिखलीत झाले पाहिजे-  विकास साने

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणार 850 खाटांचे रुग्णालय मोशी येथे स्थलांतरित (Chikhali News )करण्यात आले आहे. याला चिखलीतील नागरिकांचा तीव्र विरोध असून हे नियोजित रुग्णालय चिखली येथेच व्हावे. यासाठी चिखलीतील नागरिकांचे आंदोलन उभारू वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू असे विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास साने यांनी सांगितले.

पिंपरी येथे आज (बुधवारी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकास साने बोलत होते. यावेळी  ग्रामपंचायतचे माजी सदस्य सदाशिव नेवाळे, विष्णू मोरे पाटील तसेच अंकुश भांगरे, बाळासाहेब मोरे, साहेबराव रोडे, युवराज पवार, आप्पा साने, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी विकास साने यांनी सांगितले की, चिखली येथे हे रुग्णालय होणार होते. त्यावेळी 214 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तेवढ्यात क्षमतेचे रुग्णालय मोशीत स्थलांतर केले तेव्हा त्यासाठी 450 कोटीची तरतूद करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. हे रुग्णालय उभे राहीपर्यंत हा आकडा 900 कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी भीती विकास साने यांनी व्यक्त केली.

प्रशासन आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने होणाऱ्या या भ्रष्टाचारामुळे मनपाच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार पडणार आहे. शहराचे कारभारी आमदार महेशदादा लांडगे यांनी जर इच्छाशक्ती दाखवली तर हे रुग्णालय पुन्हा चिखली मध्ये स्थलांतरित होऊ शकते. तसे झाले नाही तर चिखलीतील नागरिकांच्या वतीने वेळप्रसंगी आपण न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे विकास साने (Chikhali News )यांनी सांगितले.

Assembly By elections: कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान

याबाबत सविस्तर माहिती देताना विकास साने यांनी सांगितले की, चिखली येथील गायरान जमिनीवरील गट नंबर 1653, 1654 वरील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 20 जानेवारी 2021 रोजी मंजूर केलेले 850खाटांचे रुग्णालय वनीकरण जमिनीचे कारण सांगून अचानक मोशी येथे हलवल्यामुळे चिखलीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी प्रश्न आताकुठे शांत होत असताना, महानगरपालिकेच्या सापत्न भूमिकेवर शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एक महिन्यापूर्वी सत्ताधारी पक्षाची आणि महापालिका प्रशासनाने संगनमत करून, रुग्णालय चिखली मधून हलवण्याचा घाट घातल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या आयुक्तांना लेखी पत्र लिहून जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला महापालिकेने लेखी उत्तर देऊन रुग्णालय चिखली येथे होणार नसून ते मोशी येथे होणार असल्याचे सांगितले. या विषयी अधिक चौकशी केली असता, वनीकरण जमीन असल्याने रुग्णालय होण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले मात्र, या गायरान जमीन असलेल्या गट नंबर 1653 ,1654 यापूर्वीच जलशुद्धीकरण केंद्र, जगद्गुरू तुकाराम महाराज संतपीठ हे उभारले गेले आहे. असे असले तरी, सदर जमीन ही वनीकरणाच्या ताब्यात असली तरी, FCA 1980 (Forest Conservation Act) नुसार वनीकरणाच्या कायद्यात आवश्यक ते बदल करून, चिखली मधेच रुग्णालय उभारणे सहज शक्य आहे. या जागेच्या कागद पत्रांवर अद्यापही इतर हक्कांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे रुग्णालय, अग्निशमन केंद्र प्राथमिक शाळा अशी नोंद आहे. या जागेत मनपा रुग्णालय उभारण्यात येणार असून येथे कोणीही अतिक्रमण करू नये अशा आशयाचा फलक उभारण्यात आलेला आहे.

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नोकर भरतीचे आयोजन करण्याबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे निवेदन 

याविषयीची माहिती मी स्वतः सेनापती बापट रोड, पुणे येथील वनीकरण विभागाच्या वरीष्ठ (Chikhali News )अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून घेतली असून, केवळ राजकिय हेतूने प्रेरित होऊन चिखलीतील  नागरिकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. हा निर्णय म्हणजे चिखलीकरांची गळचेपी करण्याचा डाव आहे आणि हा डाव चिखलीतील नागरिक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार याप्रसंगी विकास साने यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.