Assembly Bye-Elections: कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान

एमपीसी न्यूज : पुण्यातील कसब्याच्या भाजप आमदार (Assembly Bye-Elections) मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तर, 27 फेब्रुवारीला मतदान आणि 2 मार्चला मतमोजणी असणार आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी कर्करोगाने निधन झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.