Chicnhwad : शहरात 18 हजार 312 मतदार वाढले

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 8 हजार 722 नवमतदारांची भर ( Chicnhwad) पडली आहे. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर, भोसरी मतदारसंघात 6 हजार 112 आणि पिंपरी मतदारसंघात 3 हजार 478 नवमतदार झाले आहेत. शहरात म्हणजे या तीन मतदारसंघात एकूण 18 हजार 312 मतदार वाढले आहेत. तर, मयत व दुबार असलेले एकूण 2 हजार 301 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनर्निरीक्षणाच्या कार्यक्रमातंर्गत गेल्या 9 महिन्यात 21 मतदारसंघात एक लाख 60 हजार मतदारांचे बदल अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती आणि मयतांसह दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली.

PMPML : अवघ्या सात दिवसात पीएमपीएमएलने केला 3 लाखांचा दंड वसूल

या मोहिमेत राज्यात क्रमांक दोनचा सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवड ( Chicnhwad) विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 8 हजार 722 नवमतदारांची नोंद झाली आहे. त्यांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

तर, 1 हजार 27 मतदारांची दुबार व मयत नावे वगळण्यात आली आहेत. पाच हजार 249 मतदारांच्या नावात दुरस्ती करण्यात आली आहे. या मतदार संघात सर्वांधिक एकूण 14 हजार 998 अर्ज प्राप्त झाले होते.

त्या पाठोपाठ भोसरी मतदारसंघात 6 हजार 112 नवीन मतदार झाले आहेत. एकूण 878 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर, 5 हजार 281 जणांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली. एकूण 12 हजार 271 अर्ज करण्यात आले होते.

तर, पिंपरी मतदारसंघात 3 हजार 478 जणांनी नोंदणी केली आहे. एकूण 396 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. तीन हजार 1 मतदारांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली. या मतदार संघातून एकूण 6 हजार 875 अर्ज प्राप्त झाले ( Chicnhwad) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.