Maval : सांगवडे गावात आढळला बिबट्या

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे गावात ( Maval) बिबट्या आढळला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या.

वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 7) रात्री सांगवडे गावात रोशन जगताप यांच्या घरासमोर बिबट्या आढळला. जगताप यांनी घराबाहेर लावलेल्या सीसीटिव्ही मध्ये बिबट्या आल्याचे कैद झाले आहे. बिबट्याने जगताप यांच्या श्र्वानावर हल्ला केल्याचे दिसत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Chicnhwad : शहरात 18 हजार 312 मतदार वाढले

सांगवडे गावात दरवर्षी या कालावधीत बिबट्या आढळतो. त्यामुळे वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाऊ नये. परिसरात फटाके फोडून आवाज करावा. बिबट्या आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सांगवडे येथे आढळलेला बिबट्या जखमी आहे. त्याच्या उजव्या पायाला इजा झाली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव ( Maval) यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.