NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आझमभाई पानसरे यांची भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन समर्थन दिल्यानंतर आज (सोमवारी) शहर दौऱ्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पानसरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Maval : सांगवडे गावात आढळला बिबट्या

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, युवा नेते निहाल पानसरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पानसरे यांची भूमिका समोर आली नव्हती. अखेर पानसरे यांनी रविवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेत आपले समर्थन दिले. शहरातील राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली. पानसरे यांनी शरद पवार यांना समर्थन दिल्याने हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

आज दुसऱ्यादुवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले आहेत. पाटील यांनी  माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांच्याशी (NCP) चर्चा केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.