NCP : निवडणूक आयोगातील सुनावणी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘आता’..!

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या बाबतीत जे घडले ते अतिशय (NCP) दुर्दैवी आहे. या देशात पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीच धोक्यात येईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय द्यावा. आता निकाल लागणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. त्यांचे म्हणणे ऐकतील, आमचे म्हणणे ऐकतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक दिवंगत डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून आज सोमवारी  पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विविध पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित आहेत.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आझमभाई पानसरे यांची भेट

अशोक शीलवंत यांच्या नावाने धम्मदीप पुरस्कार दैनिक लोकमतचे पुणे आवृत्ती संपादक संजय आवटे, समाजभूषण पुरस्कार माजी आमदार ॲड.जयदेव गायकवाड आणि बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, विद्या भूषण पुरस्कार इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, पत्रकार भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि काव्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ कवयत्री स्वाती सामक यांना (NCP) प्रदान करण्यात आला.

त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष (NCP) शरद पवार यांचाच आहे. याबाबत कोणालाही विचारले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचाच असे सांगितले जाईल. निवडणूक आयोगात निर्णय लागल्यावरच अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय का हे कळेल.

पण, शरद पवार साहेबांनी काढलेला हा पक्ष आहे. पक्षाची पायाभरणी केली आहे. देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच निवडणूक आयोगाला काही वेगळा करण्याची वेळ आली तर हे दुर्दैव आहे.टोल प्रकरणात माझा फार अभ्यास नाही.

एकनाथ शिंदे यांनी टोल वसुली विरोधातील याचिका मागे घेतली आहे हे मला सांगता येणार नाही. यामध्ये काही सेंटलमेंट झाली आहे असे मी म्हणणार नाही. टोल प्रकरणात माझा फार अभ्यास नाही, असेही ते (NCP) म्हणाले

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.