Pimpri News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नोकर भरतीचे आयोजन करण्याबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे निवेदन 

एमपीएस न्यूज :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नोकर भरती 2022 आयोजन करण्याबाबत संतोष शिंदे, प्रदेश महासचिव, रयत विद्यार्थी विचार मंच संस्था यांनी विठ्ठल जोशी, उप आयुक्त, (Pimpri News) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदन दिले आहे. तसेच हे निवेदन आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त -1 प्रदीप जांभळे पाटील यांच्या कार्यालयात दिले आहे.

 

शिंदे निवेदनात म्हणतात की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांनी अर्ज करून चार-साडेचार महिने उलटून गेले असता अद्याप देखील ही परीक्षा घेण्यात आलेली नाही. महापालिकेकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये ऑक्टोंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु सध्या 2023 मधील जानेवारी महिना सुरू आहे.

Pimpri News: श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी विस्तारीत युनिट, दिवसाला 30 शस्त्रक्रिया होणार

तरीदेखील महापालिकेकडून कोणत्याही सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या नाहीत. उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण आपल्या महापालिकेच्या जाहिराती बरोबरच पुणे महानगरपालिकेची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती. सध्या पुणे महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांचे जॉइनिंग देखील आले आहे.

 

तरी कोणत्या कंपनीमार्फत व केंव्हा हि परीक्षा होणार आहे. याच्या सूचना संबंधित उमेदवारांना कळवाव्यात व ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.