YCMH News : अपघातातील जखमीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – अपघातात जखमी (YCMH News) झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाची पुन्हा तपासणी व्हावी, अशी मागणी मृतांच्या घरच्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

संबंधीत तक्रारीची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठविण्यात आली आहे. ही मागणी करणारे निवेदन मृत सुनिल एकनाथ पाचांगे (वय 38 रा. वडगाव मावळ) यांची मुलगी बरखा सुनिल पाचांगे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक करत आहेत. त्यांनीच या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बरखा यांचे वडील सुनिल यांचा 21 डिसेंबर रोजी अपघात झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पुढे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात (YCMH News) उपाचारासाठी नेले असता त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यावेळी तक्रारदार बरखा व त्यांच्या आईला पोलिसांनी व डॉक्टरांनी सुनिल यांना भेटू दिले नाही. ज्यावेळी पत्नी आणि मुलीची भेट सुनिल यांच्यासोबत झाली त्यावेळी त्यांचा थेट मृत्यूच झाला होता.

Chikhali News: 850 खाटांचे नियोजित रुग्णालय चिखलीत झाले पाहिजे-  विकास साने

यावेळी त्यांच्या शरीराची चिरफाड झाल्याने सुनिल यांचे अवयव काढून ते विकल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे सुनिल यांचा मृत्यू झाला; हा मृत्यू संशयास्पद असून मृत्यूनंतरही शवविच्छेदन अहवाल व अनेक वेगवेगळी कागदपत्रे पोलिसांनी अद्यापही फिर्यादी यांना दिलेली नाही.

त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा. यामध्ये संशयित असणारे राहूल बाळासाहेब धामणकर, बाळासाहेब छबुराव धामणकर, तसेच गाडीमालक तेजस गंगाराम देवकर, परंदवाडी शिरगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप गडीलकर व वायसीएममधील संबंधित डॉक्टरांची कसून चौकशी करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.