YCMH : वायसीएम रुग्णालयातील मेडिकल पुन्हा सुरू होणार

एमपीसी न्यूज – महापालिका कर्मचारी महासंघाच्या आजी-माजी (YCMH)पदाधिकाऱ्यांच्या वादात मागील दीड वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील मेडिकल बंद होते.

 

मात्र, अखेर हे मेडिकल पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महासंघाच्या सत्ताधारी गटाने ताबा घेत औषधे खरेदी प्रक्रिया सुरू केली. या मेडिकलमध्ये अत्यावश्यक व बाह्य रुग्णांना दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या औषधे उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Pune : एस क्रिकेट लीग स्पर्धेत निर्माण क्वीन्स आणि अमन किया रायडर्सची बाजी.

पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर (YCMH)वायसीएम रुग्णालयात रुग्णांसाठी मेडिकल सुरू केले होते. या मेडिकलमधून बाह्य रुग्ण विभाग आणि अत्यावश्यक रुग्ण विभागातील रुग्णांना, तसेच बाहेरुन आलेल्या नागरिकांना देखील दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या, ओषधे मिळत होती. हे मेडिकल सुरु झाल्यामुळे वायसीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण व अत्यावश्यक विभागातील उपचारास येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.

 

मात्र, कर्मचारी महासंघाची मार्च 2022 रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष असलेल्या अंबर चिंचवडे गटावर बबन झिंजुर्डे गटाने मात करत महासंघावर सत्ता मिळवली. निवडणुकीत झिंजुर्डे गटाने बाजी मारल्यामुळे महासंघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला.

या वादात महासंघ कार्यालयासह वायसीएम मेडीकल संचलित करण्याचा विषय अडकला. वायसीएम रुग्णालयातील मेडीकलमध्ये औषधांचा साठा शिल्लक आहे. यांचा अहवाल सत्ताधारी झिंजुर्डे गटाने तत्कालीन चिंचवडे गटाकडे मागितला. मात्र, त्यावरुन दोन्ही गटात वाद झाला. त्यामुळे 15 मार्च 2022 रोजी मेडिकल बंद करण्यात आले. त्यानंतर आज तागायत आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या वादात हे मेडिकल बंद होवून तब्बल अठरा महिने उलटले आहेत.

 

दरम्यान, महासंघाच्या सत्ताधाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयात येवून पोलिस बंदोबस्तात मेडिकलचा ताबा घेतला. सध्यस्थितीत मेडीकलमधील उपलब्ध गोळ्या आणि औषधांचे ऑडीट करण्यात येणार आहे. तसेच, मेडिकल सुरू करण्यासाठी आवश्यक गोळ्या व औषधे खरेदी करून लवकरच मेडिकल पुन्हा रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.