Pimpri : पिंपरी येथे व्यावसायिकांमध्ये किरकोळ कारणावरून मारामारी, परस्पर विरोधी गुन्ह दाखल, पाच जणांना आटक

एमपीसी न्यूज : पिंपरी येथे दोन व्यावसायिकांमध्ये (Pimpri) किरकोळ कारणावरून भांडणे झाली. याच भांडणाचे रूपांतर पुढे मारामारीत झाले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अयफाज हमीद कुरेशी (वय 30, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून इरशाद जाकीर कुरेशी (वय 30), जाकिर कुरेशी (वय 50), शाहिद जाकिर कुरेशी, फैज जमिर कुरेशी (वय 25), मुबीन शब्बीर कुरेशी (वय 25), वाहिद मजीद कुरेशी (वय 35) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

अयफाज कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी इरशाद हे ओळखीचे आहेत. फिर्यादीच्या शेजारी इरशाद याने त्याचा व्यवसाय सुरु केला. यावेळी त्यांच्यात वाद झाले. याचाच राग येवून त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून बांबू, लोखंडी पाईप, यांनी मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या लोकांना समोरही आरोपींनी दहशत निर्माण केली.

Pune : कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग ; व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मुरलीधर मोहोळ यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

तर इरशात कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयफाज हमीद कुरेशी, रियाज रज्जाक कुरेशी, झैद युसुफ कुरेशी, अझर हमीद कुरेशी, हसन सादीक कुरेशी, अकबर सादिक कुरेशी, कादीर रियाज कुरेशी,तन्वीर गफार कुरेशी, (Pimpri) शोहेब मुक्तार कुरेशी, अस्लम फत्ते अहमद कुरेशी, इस्माईल बशीर कुरेशी व इतर पाच ते सात इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

इरशाद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आयफाज कुरेशी हा दुकानाच्या दरवाजाला प्लाय लावत असतान इरशाद यांनी त्याला प्लाय लावण्यास मनाई केली. यावेळी आरोपींने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दगड व लाकडी बांबूने मारहाण केली. परिसरात दहशत निर्माण केली. यावरून पिंपरी पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.