Pimpri Chinchwad RTO : चारचाकी गाडीला पसंतीचा क्रमांक पाहिजे; मग अर्ज करा अन् मिळवा हवा तो क्रमांक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (Pimpri Chinchwad RTO)कार्यालयात चारचाकी वाहनांसाठी ‘एलजे’ ही क्रमांकाची नवीन मालिका सुरू होत आहे.

नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक पाहिजे असेल तर त्यांनी अर्ज करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी (Pimpri Chinchwad RTO)वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.

Pune : कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग

चारचाकी वाहन क्रमांकाची यादी 8 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात आल्यानंतर अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी दुपारी 2.30 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून जमा करावा. डीडी ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता लिफाफे उघडून जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्क बदल झाल्यास त्यावेळी विहीत करण्यात आलेले शुल्क लागू राहणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.