Pune : प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटणार- प्रमोद नाना भानगिरे

एमपीसी न्यूज – प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या (Pune )शाळेतील सर्व विद्यार्थिनींना आज  सॅनिटरी नॅपकिन वाटणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख (शिंदे गट) प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.

पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिनचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थिनींची होणारी गैरसोय, आरोग्याची अडचण टाळण्याकरित पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले होते.

प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की पुणे महानगरपालिकेत गेल्या (Pune )तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झालेले नाही. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये व आर्थिक अडचण लक्षात घेता आम्ही हे अभियान संपूर्ण पुण्यात राबविणार आहोत. शहरातील महापालिकेच्या शाळेतील किशोरवयीन 25 हजार 695 विद्यार्थिनींना या अभियानाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन पुरवले जाणार आहेत.

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

महापालिकेच्या यंत्रणेला वेळ लागतोय आणि यामुळे मुलींची गैरसोय होता कामा नये, हा या मागचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचे भानगिरे यांनी जाहीर केले. पुणे महानगरपालिकेने गेल्या चार वर्षापासून मुलींच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन दिलेले नाहीत, मागील दोन वर्षात ठेकेदाराच्या वादात निविदा रद्द करण्यात आल्या तसेच दरवर्षी 26000 नॅपकिन पालिकेकडून पुरवल्या जातात.

मात्र, दोन वर्षापासून हा पुरवठा झालेला नसल्या कारणाने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. यावेळी महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, शहर समन्वयक शंकर संगम, महिला उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे, श्रुती नाझिरकर, विधानसभा प्रमुख संतोष लांडगे, सुनीता उकिरडे, नेहा शिंदे,आकाश शिंदे, आकाश रेणुसे व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.