Pune : नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली सराईत गुन्हेगारांची परेड; गुन्हेगारांना सज्जड दम

एमपीसी न्यूज : पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune) यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम भरण्यात आला.

कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50 टोळ्यांतील सुमारे 267 अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलिस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते.

Bhosari : ‘गाव चलो अभियान’ पं. दिनदयाळ उपाध्याय यांना समर्पित, आमदार महेश लांडगे यांची माहिती

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो (Pune) क्रमांक बदलल्याची माहिती पोलिस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.