Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

एमपीसी न्यूज – देशात लवकरच सार्वत्रिक निवडणूक होत (Pune )असून या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळासह भेट घेत चर्चा केली.

लोकसभा निवडणूक, त्या अनुषंगाने मतदार याद्या आणि त्यातील तांत्रिक बाबी, नव मतदारांची नोंदणी असे विविध मुद्दे भेटीत चर्चिले.

शिवाय या काळात प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

Bhugaon : कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर – आदिती तटकरे

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, (Pune )आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भीमाले, शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, पुनीत जोशी, सुभाषनाना जंगले, राहुलआप्पा भंडारे, चिटणीस अजयआप्पा खेडेकर, लोकसभा सहसंयोजक दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, राजेश येनपुरे, राजाभाऊ शेंडगे, कुलदीप साळवेकर, प्रशांत हरसूले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.