Alandi News : सद्गुरू जोग महाराज संस्थेत स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ सायकल वाटप

एमपीसी न्यूज- सद्गुरू जोग महाराज संस्थेत षट्तीला एकादशी निमित्त भक्ती शक्ती संघाच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप परिवाराच्या वतीने वारकरी साधकांना सायकल चे वाटप (Alandi News)करण्यात आले.

Chikhali News: 850 खाटांचे नियोजित रुग्णालय चिखलीत झाले पाहिजे-  विकास साने

वारकरी शिक्षण संस्थेत आपले शिक्षण पूर्ण करत असताना वारकरी प्रथे परंपरेप्रमाणे येथील संस्थेतील  विद्यार्थ्यांना  मधूकरी मागण्यासाठी पायी चालत  पंचक्रोशीतील गावामध्ये  फिरावे लागते. पंचक्रोशीतील गावांमध्ये मधूकरीसाठी त्यांना चार ते पाच तास पायी चालावे लागते.मधूकरी मागण्यासाठी फिरणाऱ्या या संस्थेतील विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा व वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षण आभ्यासासाठी अधिकसा वेळ भेटावा,याकरिता लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप परिवाराच्या वतीने सदगुरू जोग महाराज वारकरी संस्थेत सायकलचे वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदीले यांनी सांगितले की स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा ऋणानुबंध होता,  वारकऱ्यांना वेळोवेळी त्यांनी सहाकार्य केले आहे. भाऊंच्या समाजकार्याचा वारसा पुढे त्यांचे बंधू विजय जगताप आणि शंकर जगताप चालवत आहेत. त्याच अनुषंगाने वारकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष हभप संदीप महाराज लोहर यांनी केले. तर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Pune Crime News : पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने दुकानदार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

यावेळी स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप, स्वामी शिवानंदजी, अध्यापक उल्हास महाराज सुर्यवंशी, तुकाराम महाराज मुळीक, माजी नगरसेवक सुरेश भोईर, आळंदी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, सुभाष काटे, संजय भिसे, ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, शहर उपाध्यक्ष विकास पाचुंदे तसेच वारकरी शिक्षण (Alandi News) घेणारे विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.