Chikhali : डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई; 30 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रिय आरोग्य कार्यालयाच्या (Chikhali) वतीने डेंगूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 29 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

Pune : 5 ऑगस्ट रोजी रंगणार गालिबच्या उर्दू कवितांचा कार्यक्रम

जाधववाडी चिखली, कुदळवाडी नेहरूनगर आदी परिसरात डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांची पाहणी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जैनवाल वैभव घोळवे क्षितिज रोकडे विक्रम सौदायी यांनी ही कारवाई केली. सुमारे 50 आस्थापनांची तपासणी या मोहिमेत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.