Chinchwad : आयकार्ड पडल्याचा बहाणा करत तरुणाचा संपूर्ण पगारच नेला चोरून

एमपीसी न्यूज : तुम्ही माझे पडलेले आयकार्ड घेतले आहे, असे बोलण्यात गुंतवून (Chinchwad) तरुणाचा महिनाभराचा संपूर्ण पगारच दोघांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.20) दुपारी चिंचवड येथे भर रस्त्यात घडली आहे.

याप्रकरणी अकबर अली मोहम्मद इस्लाम (वय 23 रा चिंचवड) याने शुक्रवारी(दि.21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मोपेड गाडीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

Chikhali : डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई; 30 हजारांचा दंड वसूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कामाचा पगार घेऊन पायी चालत जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आरोपी आले व त्यांनी तुम्ही माझे पडलेले आयकार्ड घेतले आहे, असे सांगितले.

आय कार्ड शोधण्याचा बहाणा करत त्यांनी फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवले. त्यांची सॅक तपासण्यास सांगितले. सॅकमध्ये असलेली 25 हजार रुपयांची रोख रक्कम पाहून त्यांनी फिर्यादीला ही रक्कम रुमालामध्ये गुंडाळण्यास सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

यावेळी त्यांनी फिर्यादी आयकार्ड शोधत असताना हातचलाखी करत पैसे काढून घेत (Chinchwad) रुमालात कागदाचे बंडल ठेवले. आयकार्ड मिळाले नाही म्हणून ते दोघे निघून गेले असता फिर्यादीने रुमाल उघडून पाहिला तर त्यात कागदाचे बंडल निघाले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.