Sangavi : बँकेने जप्ती आणलेल्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला म्हणून दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बँकेने जप्ती आणून सील केलेल्या फ्लॅटमध्ये (Sangavi) बेकायदेशीर रित्या प्रवेश केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.21) जुनी सांगवी येथील पवार नगर येथे घडली आहे.

याप्रकरणी ओम धारशे भावसार व महिला आरोपी यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सौरभ कुमार चंद्रसेन सिंग यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचा दिगंबर क्लासीक अपार्टमेंट येथील फ्लॅटवर कॅनरा बँक यांनी कायदेशीर जप्ती आणली आहे.

त्यामुळे हा फ्लॅट सील केला आहे. असे असताना देखील आरोपींनी (Sangavi) कोणत्याही परवानगी शिवाय सील तोडून घरात प्रवेश केला. यावरून त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : आयकार्ड पडल्याचा बहाणा करत तरुणाचा संपूर्ण पगारच नेला चोरून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.