Wakad : वाकड पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी गंभीर गुन्हे करणाऱ्या अट्टल (Wakad) आरोपी राहुल विलास चव्हाण (रा. काळाखडक झोपडपट्टी) याच्यावर एम पी डी ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्याने त्याच्या साथीदारांसह वाकड पोलीस स्टेशन, हिंजवडी पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयत्या सारखी जीवघेण्या हत्यारांसह, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी मागणे, दुखापत, गंभीर दुखापत, अपहरण करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, चोरी करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, चोरी, खंडणीसाठी तोडफोड करुन दहशत निर्माण करणे व बेकायदेशीरपणे घातक हत्यार जवळ बाळगणे, तसेच बेकायदेशीरपणे जमाव जमवुन दुखापत करणे व तोडफोड करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. असे एकूण 16 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

त्याच्यावर दाखल गुन्ह्याची कागदपत्रे पडताळणी करून पोलीस (Wakad) आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी (दि.21) एम पी डी ए अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध केल्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, पोलीस नाईक कारभारी, सहायक पोलीस फौजदार पाटोळे, वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त चौबे यांनी दहशत निर्माण करणा-या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे ठरवले आहे. एम. पी. डी.ए. कायदयान्वये स्थानबद्धतेच्या एकूण 4 कारवाया करण्यात आलेल्या असून यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Sangavi : बँकेने जप्ती आणलेल्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला म्हणून दोघांवर गुन्हा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.