Pimpri : एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; एमआयडीसी बचाव आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात (Pimpri) कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. एमआयडीसी परिसरात 6 ते 7 हजार छोटे-मोठे उद्योग असून या उद्योगांमधील कचरा उचलला जात नाही. कचरा उचलण्याचे शुल्क उद्योजक देत असतानाही कचरा उचला जात नसल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

अनेक उद्योजकांच्या कचऱ्याबाबत तक्रारी येत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये कचरा साठवण करून ठेवावा लागतो. बाहेरच्या गाड्या बोलवून द्यावा लागतो. या कचऱ्याच्या प्रश्नामुळे अनेक कंपन्यांमधील कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून यायला सुरुवात झाली आहे.

Wakad : वाकड पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई

पाऊस काळामध्ये डेंग्यू मच्छर डास मलेरिया ताप उलट्या जुलाब या प्रकारचे त्रास कामगारांना दिसून येत आहेत. कंपन्यांमध्ये माल साठवून ठेवण्यापेक्षा कचराच जास्त साठवून ठेवण्यासाठी जागा व्यापत आहे.

अनेक कंपन्यांना खाजगी गाड्या बोलवून कचरा द्यावा लागतो. महापालिकेने (Pimpri) कचऱ्यावर उपकर लावला. परंतु कचरा उचलण्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यास महानगरपालिका असमर्थ ठरत आहे. त्वरित यावर बैठक घेऊन महानगरपालिकेने उपायोजना न केल्यास एमआयडीसी बचाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष  भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.