Chikhli : चिखली-कुदळवाडीतील वाहतूक समस्या सोडविण्याची दिनेश यादव यांची मागणी

एमपीसी  न्यूज – चिखली-कुदळवाडी परिसरातील मुख्य चौकात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना वाहतुकीच्या रहदारीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे चिखली व परिसरातील वाहतूककोंडी सोडवावी, यासाठी स्विकृत सदस्य  नगरसेवक दिनेश यादव यांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांकडे मागणीचे निवेदन दिले आहे.

चिखली भागात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या भागातून नोकरीच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. तळवडे आयटी पार्क, चाकण, निघोजे, मोई याठिकाणी नोकरी निमित्ताने नागरिक चिखली कुदळवाडी भागातून जात असतात.

यामुळे रात्रीच्या वेळी आणि सकाळी वाहतूककोंडी होत असते. तसेच चिखली चौक, कुदळवाडी चौक, मोईफाटा चौक या भागातील वाहतूक नियंत्रक दिवे चालू करण्यात यावे. वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यात यावी व वाहतूक सुरुळीत करावी, अशी मागणी त्यांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.