Bhosari : वाहतूक पोलिसाने स्वखर्चाने बुजवले चार ठिकाणचे खड्डे; पोलीस आयुक्तांनीही केले कौतुक

एमपीसी न्यूज – भोसरी वाहतूक विभागात कार्यरत असलेले (Bhosari)  पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय किसन कावरे यांनी पुणे-नाशिक महामार्गावर चार ठिकाणी स्वखर्चाने खड्डे बुजवले. खाकी वर्दीतील कावरे यांनी कर्तव्यावर असताना स्वतः फावडे हातात घेत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये खडी भरून रस्त्याची डागडुजी केली. या कामगिरीचे थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील कौतुक केले.

पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कावरे हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते पुणे-नाशिक महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमांचे काम करतात.

गुरुवारी ते मोशी टोलनाका येथे वाहतुकीचे नियमन करीत होते. पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्डा पडला होता. खड्डा मोठा असल्याने वाहन चालक बाजूने वाहने चालवत होते. दोन लेनची वाहतूक एकाच लेनवर आल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत होती.

Charholi : आकर्षक कमिशन देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक 

ही बाब लक्षात आल्यानंतर कावरे यांनी खडी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीकडून एक ट्रॅक्टर खडी स्वतःच्या पैशांतून विकत घेतली. ती खडी खड्ड्यांमध्ये भरून खड्डे बुजवून घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली.

या मार्गावर रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक महामार्ग तसेच कंपन्यांमधील जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. शिवाजी वाडी येथे देखील महामार्गावर अशाच प्रकारचा खड्डा पडला होता.

गुडविल चौक तसेच नाशिक फाटा कासारवाडी येथेही पडलेले खड्डे कावरे यांनी स्वतः बुजवले आहेत. कावरे यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

कावरे यांची कर्तव्य परायणता निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दत्तात्रय कावरे यांचे कौतुक केले. “आमच्या पोलीस अंमलदारांनी नागरिकांच्या सोयीसाठी चाकोरीबाहेर जाऊन जे कर्तव्य बजावले ते पाहून आनंद झाला.

त्यांच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. पोलीस दलातील इतर सर्व सदस्यांनी याचा आदर्श घेऊन परिपूर्ण क्षमतेने नागरिकांना ऊत्तमोत्तम सेवा द्यावी, असा सल्ला देखील पोलीस आयुक्तांनी दिला (Bhosari)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.