Talegaon: निवृत्त शासकीय अधिकारी जयवंत जाधव यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (मावळ) येथील निवृत्त शासकीय अधिकारी जयवंत तुकाराम जाधव (वय 80 वर्षे) यांचे  आज (रविवार) पहाटे  वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे पश्चात दोन मुलगे,एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे  असा परिवार आहे.

कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांचे ते वडील होत. जयवंत जाधव यांच्या पार्थिवावर सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.जयवंत जाधव यांनी पुणे येथील फोटोझिंको शासकीय मुद्रणालयात 35 वर्षे प्रदिर्घ सेवा केली. या काळात त्यांनी  मशीनमन ते विभागप्रमुख अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली. कमीत कमी वेळेत विक्रमी मतपत्रिका छपाई बद्दल शासनाने दोन विशेष वेतनवाढी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.