Chinchwad : … आणि काही तासांतच ‘तो’ पुन्हा आई-बाबांच्या कुशीत विसावला!

एमपीसी न्यूज – आजीबरोबर उद्यानात फिरायला गेलेला छोटा चार (Chinchwad) वर्षांचा मुलगा हरवलामात्र एका तरुणाने दाखवलेल्या सजगतेमुळे अवघ्या काही तासांतच तो चिमुकला आई- बाबांच्या कुशीत विसावला. चिंचवडच्या संभाजीनगर भागात काल (गुरुवारी) ही घटना घडली.

साधारण चार – साडेचार वय वर्ष असलेला निर्मित दुबे हा बालक पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या संभाजीनगर येथील साई उद्यानात सायंकाळी आपल्या आजी सोबत खेळायला गेला होता.

उद्यानात गेल्यावर आजी उद्यानातील मंदिरात पूजा करत होती, त्यावेळी निर्मित उद्यानात खेळत होता. आजीची पूजा संपल्यावर आजीने उद्यानात खेळत असलेल्या निर्मितकडे पहिले असता आजीला तो तेथे दिसला नाही.

मग आजीने निर्मितचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजीने उद्यानात सगळीकडे निर्मितला शोधले असता त्यांना निर्मित उद्यानात आढळला नाही. आता सायंकाळचे 6 वाजत होते.  आजीने घाबरून याबाबतची माहिती घरी असलेल्या कुटुंबियांना दिली. ही बाब ऐकून घरातील सर्व कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. घरातील महिला या घटनेने घाबरून गेल्या होत्या.

घरातील मंडळींनी शितापीने हालचाली केल्या. परिसरात असलेल्या (Chinchwad) पोलीसांना तात्काळ याबाबतची माहिती दिली आणि तेथील परिसरात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील कळवले. परिसरात सर्वत्र शोध सुरु झाला.

आई, वडील, नातेवाईक, मित्रमंडळी, कार्यकर्ते, पोलीस सर्वजन निर्मितचा शोध घेत होते.  दोन अडीच तासांचा कालावधी उलटला निर्मितचा काही पत्ता लागेना. आता हळूहळू कुटुंबीयांचा धीर सुटत चालला होता.

रात्री 8.30 च्या सुमारास संभाजीनगर, बर्डव्हॅली परिसरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कल्पेश कन्हेरे हे ऑफिस वरून घरी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी पोहचले. त्यांनी तेथे त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरला. ते तेथून बाहेर पडत असताना एक पाच ते सहा वर्ष वय असलेली गरीब, गरजवंत मुलगी खाण्यासाठी कल्पेश यांना पैसे मागत होती.

Talawade : तळवडेतील दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

कल्पेश यांनी नेहमी प्रमाणे लहान मुल असल्याने पैसे न देता काहीतरी खाण्याचे पदार्थ खरेदी करून देण्यासाठी शेजारी असलेल्या स्टॉल वर पोहचले. तेथे त्यांना एक चांगले कपडे घालून, सुस्थितीत असलेला एक मुलगा बसलेला दिसला. त्याच्याकडे पाहून कल्पेश यांना थोडीशी शंका आली.

त्यांनी सोबत असलेल्या मुलीला विचारले की ‘हा कोण आहे?’ या (Chinchwad) प्रश्नावर त्या मुलीने ‘माझा भाऊ आहे.’ असे उत्तर दिले. त्या दोघाच्या परिस्थितीची तुलना करता कल्पेश यांची शंका अधिक बळावली. त्यांनी त्या मुलाला विचारले की, ‘ही मुलगी तुझी कोण आहे?’ या प्रश्नावर त्या मुलाने ‘माझी मैत्रीण आहे’ असे  सांगितले.

त्यानंतर कल्पेश यांनी त्या दोघांची अधिक चौकशी केली. तेथेच ओंकार बजबळ नामक व्यक्ती थांबली होती. त्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. कल्पेश आणि ओंकार यांनी त्या दोघांची चौकशी करायला सुरूवात केली.

त्यावेळी त्या मुलीने सांगितले की, हा मुलगा मला बर्ड व्हॅली उद्यानाजवळ सापडला. त्यानंतर हे सिद्ध झाले की हा मुलगा त्या मुलीचा कोणीच नाही. मग कल्पेश आणि ओंकार यांनी त्या मुलाची चौकशी केली. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला.

रात्रीचे 9 वाजत आले होते. मुलाला विश्वासात घेऊन प्रेमाने त्याची चौकशी करण्यात येत होती.  सुदैवाने त्या मुलाला थोडेफार बोलता येत होते. त्या दोघांनी मुलाच्या आई वडिलांबाबत चौकशी केली. सुदैवाने त्या मुलाला त्याच्या आईचा मोबाईल नंबर तोंडपाठ होता. ओंकार यांनी दोन तीन वेळा त्या नंबरवर संपर्क केला असता नंबर चुकीचा असल्याचे आढळले.

चौथ्या प्रयत्नात त्या मुलाने योग्य नंबर सांगितला आणि मुलाच्या आईला फोन लागला. त्यानंतर कल्पेश यांनी त्या मुलाच्या आईला येथे घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्या मुलाच्या आईने धीर धरत लगबगीने मुलगा सापडल्याची माहिती त्याच्या वडिलांना दिली आणि पत्ता सांगितला.

त्यावर पोलीस आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी कल्पेश आणि ओंकार यांना मुलाला साई उद्यान येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी मुलाला निश्चित स्थळी घेऊन गेले. मुलाला पाहून मुलाची आई, वडील, नातेवाईक जोरजोरात रडायला लागले.

निर्मित रात्री 9 च्या सुमारास सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे आपल्या घरी परत आल्याने त्याच्या कुटुंबियांचे डोळे आणि छाती भरून आली होती.

दरम्यान पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केले होते. मुलगा खेळत खेळत गेटपर्यंत आला आणि त्या मुलीसोबत गेला असे आढळते.

यावेळी पोलिसांनी आणि कल्पेश, ओंकार यांनी एकमेकांना घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावर पोलिसांनी कल्पेश कन्हेरे आणि ओंकार बजबळ यांचे कौतुक केले.

साई उद्यानासमोर नातेवाईक, मित्रमंडळी, कार्यकर्ते, पोलीस जमा झाले होते. त्यामुळे खूप गर्दी झाली होती. सर्वांनी कल्पेश आणि ओंकार याचं भरभरून कौतुक केलं. आपल्या आई वडिलांचे आपल्यावर चांगले संस्कार असल्याचे कल्पेश यांनी सांगितले. तसेच एक मोठी दुर्घटना टळली असल्याचेही त्यांनी म्हटलं.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे निर्मित दुबे सुखरूप घरी पोहचला. यावेळी त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंदाला सीमा उरल्या नव्हत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.