Chinchwad : रक्तदान शिबिरात 130 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – दिवंगत श्रीमती श्रीकुंवरबाई रतनचंदजी छाजेड यांच्या द्वितीय पुण्यस्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 130 जणांनी रक्तदान केले. भारतीय जैन संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष विरेश छाजेड यांच्या वतीने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

चिंचवड येथे झालेल्या या शिबिराचे उदघाटन नगरसेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, वीर विशाल संघाचे अध्यक्ष नंदकुमार लुणावत, संदेश गादिया, दिलीप नहार, गौतम नाबरिया, विजयकुमार छाजेड, शोभा छाजेड, विरेश छाजेड, सुरेश गांधी, दिलीप कटारिया, चेतन चोरडिया, महावीर नहार, शरद लुणावत आदी उपस्थित होते.

वीर विशाल संघ, गौतमलब्धी फाऊंडेशन चिंचवड, भारतीय जैन संघटना पिंपरी-चिंचवड आदींनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार छाजेड यांनी केले. आभार नंदकुमार लुणावत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.