Chinchwad Bye-Election : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या रॅलीला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

उमेदवार नाना काटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळे गुरव ते जुनी सांगवी या भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Chinchwad Bye-Election : कर्मचा-यांना ‘ईव्हीएम’ यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण

‘या भागाचा विकास करायचा असेल, तर विकासाची व्हिजन असणारा लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे. नाना काटे यांच्याकडे तो व्हिजन आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करा. या भागाचा विकास तर करूच, शिवाय पाण्यापासून सर्व समस्या सोडवण्याची हमी मी देतो’, अशा शब्दात अजित पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.‘ही पकडून आणलेली गर्दी नाही.

ही परिवर्तनाची आस बाळगून आलेली (Chinchwad Bye-Election) जनता आहे. त्यामुळे स्वत:हून आलेली ही जनता नाना काटे यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.