Chinchwad Bye-Election : कर्मचा-यांना ‘ईव्हीएम’ यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान (Chinchwad Bye-Election) होणार आहे. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. निवडणूक मतदान कामकाजासाठी प्रशासकीय पातळीवर मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक निवडणूक विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. तसेच मतदारांना देखील ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन देखील या ठिकाणी केले जात आहे.

आज प्रशिक्षण दिले. आता उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. या उपक्रमाची पाहणी आज निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. या उपक्रमाला पहिल्या दिवशी नागरिकांसह निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात येणार आहे. अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएम मशीन द्वारे मताधिकार बजावताना कोणत्याही अडचणी येऊ नये, या दृष्टीने उपक्रमात (Chinchwad Bye-Election) माहिती दिली जात आहे.

आपले मतदान झाले आहे की किंवा नाही, आपले मतदान आपण दिलेल्या उमेदवारालाच झाले आहे किंवा कसे याबाबत या उपक्रमामध्ये सविस्तर माहिती दिली जात आहे. निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे तसेच मतदान प्रक्रीयेवेळी मशीन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात आहे.

निवडणूक विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून विविध कार्यक्रमांद्वारे, पथनाट्यांद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता व्हावी. मतदानाचा टक्का वाढावा, कोणत्याही प्रकारे मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये यासाठी निवडणुक विभागामार्फत विविध स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने ईव्हीएम यंत्र हाताळणी व माहितीचे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे.

Pimpri News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करु नका; हौसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

तज्‍‌ज्ञ प्रशिक्षक म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक आणि निदेशक यांची नेमणूक या कामकाजासाठी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्या 24 फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त नागरिकांनी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी आवश्यक निवडणूक साहित्याचे पॅकींग आणि वितरणाच्या कामाची पाहणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.