Chinchwad Bye-Election : चिंचवडमधील 26 उमेदवारांचे 1 लाख 90 हजार रुपयांचे ‘डिपॉजिट’ जप्त

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 2 लाख 84 हजार 397 वैध मते (Chinchwad Bye-Election) आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (1/6) पेक्षा अधिक म्हणजेच 47 हजार 400 इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने 2 उमेदवार वगळता इतर सर्व 26 उमेदवारांची एकूण सुमारे 1 लाख 90 हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (1/6) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे 26 उमेदवारांची प्रवर्ग निहाय जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले होते. त्यानुसार निवडणुकीमधील या उमेदवारांची सुरक्षा ठेव जप्त रक्कम “इतर प्रशासकीय सेवा – 02- निवडणूक – 104 -शुल्क, दंड आणि जप्ती. इतर पावत्या – जप्त केलेली सुरक्षा ठेवींची रक्कम” या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 158 नुसार जर एखादा उमेदवार त्या मतदार संघातील एकूण उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांपैकी 1/6 इतकी मते मिळवू शकला नाही (NOTA वगळून) तर उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 34, 1 (अ) नुसार अन्वये जमा केलेली अनामत रक्कम खुल्या (Chinchwad Bye-Election) प्रवर्गातील उमेदवारांना 10 हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 हजार रुपये इतकी आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 158 अन्वये या उमेदवारांना या पोटनिवडणूकीतील एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (1/6) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे अशा प्रवर्ग निहाय उमेदवारांची जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : मुलींच्या चार वसतिगृहांना इनरव्हील क्लबकडून तेल डब्यांची मदत

चिंचवड पोटनिवडणुकीत 2 लाख 84 हजार 397 वैध मते आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (1/6) पेक्षा अधिक म्हणजेच 47 हजार 400 इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने 2 उमेदवार वगळता इतर सर्व 26 उमेदवारांची एकुण सुमारे 1 लाख 90 हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे. अनामत रक्कम जप्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये राहुल कलाटे, सुभाष बोधे, गोपाळ तंतरपाळे, सिद्दिक शेख, प्रफुल्ला मोतलिंग, बालाजी जगताप, किशोर काशीकर, श्रीधर साळवे, दादाराव कांबळे, डाॅ.मिलिंदराजे भोसले, अमोल(देविका) सुर्यवंशी, रफिक कुरेशी, मनोज खंडागळे, तुषार लोंढे, राजू काळे, हरिष मोरे, अॅड.सतिश कांबीये, जावेद शेख, सुधीर जगताप, अजय लोंढे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, सोयलशहा शेख, सतिष सोनावणे, चंद्रकांत मोटे आणि अनिल सोनवणे यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.