Pimple Saudagar : पिंपळेसौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या पुलाचे (Pimple Saudagar )काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी माजी नगरसेवक  नाना  काटे यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक 28 रहाटणी – पिंपळे सौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या (Pimple Saudagar)जुन्या पुला लगत नविन समांतर पुल बांधण्यात येत असुन आज या कामाची पाहणी काटे यांनी संबंधीत महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत केली, या पाहणी दरम्यान संबंधितांना सुचना केल्या की या पुलाचे काम करत असताना पिंपरीच्या  बाजुने शेवटच्या स्लॅबचे काम गेली अनेक दिवस  काम संथ गतीने सुरू आहे.

Kothrud : नृत्य गुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील कलाविष्कराने कोथरुडकरांची जिंकली मने!

 

ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच या पुलावरून ये – जा करणाऱ्या वाहनाची वर्दळ जास्त असुन नागरिकांना  वाहतुकीच्या खोळंबण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्याबाबात देखील योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या.

तसेच या पुलाचे काम करत असताना पिंपरीकडुन पिंपळे सौदागरकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याच्या उताराचे  काम व्यवस्थीत करून हे काम करत असताना खोदण्यात येणाऱ्या दत्त मंदीर ते महादेव मंदीर पर्यत या रस्त्याच्या दोन्ही बाजुने व्यवस्थीत डांबरीकरण करण्यात याव्या अशा सुचना देखील संबंधित अधिकारी व ठेकेदार याना करण्यात आल्या. या पाहणीवेळी प्रकल्प कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उपअभियंता अभिमान भोसले, ठेकेदार व्ही एम मातेरे कंपनीचे प्रोजक्ट मॅनेजर राजेश तनवे, इजिनियर, व इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.