Pune : राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग

एमपीसी न्यूज : आशियाई स्पर्धेतील मेन्स पेअर प्रकारातील (Pune) कांस्यविजेती बाबूलाल यादव व लेखराम ही जोडी, तसेच मेन्स फोर प्रकारातील पुनीत कुमार, जसविंदर सिंग, भीमसिंग व आशिष हा संघ यांच्याकडे पुण्यातील आर्मी रोइंग संकुलात आजपासून सुरू झालेल्या वरिष्ठ राष्टीय रोइंग स्पर्धेतील विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष राहील. आशियाई स्पर्धेत सिंगल स्कल्समध्ये चौथे स्थान मिळविणारा बलराज पन्वरकडेही सर्वांचे लक्ष राहील.

देशभरातील अव्वल 474 खेळाडू विविध गटातील विजेतेपदासाठी झुंज देत असून अव्वल 27 संघांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्ड, आर्मी स्पोर्ट्स बोर्ड, तसेच अखिल भारतीय पोलीस दल यांचा समावेश आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज येथील रोइंग तलाव येथे सीएमई कमांडंट ले. जन. ए. के. रमेश. पीसीएमसी आयुक्त शेखर, सिंग, अखिल भारतीय रोइंग संघटनेचे खजिनदार नबाबुद्दीन अहमद व संयोजन सचिव कर्नल आर. रामकृष्णन यंच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

संयोजन सचिव कर्नल आर. रामकृष्णन म्हणाले, की देशाची सेवा करणाऱ्या सेनादलचे खेळाडू अव्वल असलेल्याा रोइंगची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेसाठी पुण्यात आले असून आर्मी रोइंग नोड येथे स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.

Pune :लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान – धीरज घाटे

सन 2009 मध्ये स्थापना झालेल्या आर्मी रोइंग नोडने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा ही स्पर्धा आयोजित केली असून 2014 मध्ये पहिली, 2017 मध्ये 36वी आणि नंतर 37, 39, 40 व 41 वी स्पर्धाही येथे पार पडल्याचे त्यांनी नमूद केले. उद्या मंगळवारपासून पुरुष व महिला गटातील प्रत्येकी सात गटांमध्ये स्पर्धा रंगतील.

पुरुष गटात 318, तर महिला गटात 156 स्पर्धक सहभागी होत आहेत. पुरुष गटात सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस पेअर व कॉक्सलेस फोरमध्ये 2000 मी. व 500 मी.च्या शर्यती होतील. तसेच ओपन डबल स्कल्स, कॉक्सलेस फोर व कॉक्सलेस एट गटात 2000 मी. शर्यती होतील. पहिले दोन प्रकार नागरी स्पर्धकांसाठी आहेत.

महिला गटात सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस पेअर व कॉक्सलेस (Pune) फोरमध्ये 2000 मी. व 500 मी. च्या शर्यती होतील. डबल स्कल्स 500 मी. व अपंग पुरुष गटात सिंगल स्कल्स 200 व 500 मी. च्याही शर्यती होतील. पिंपरी- चिंचवड महपालिकेन सहप्रायोजक व सहयजमानपद स्वीकारण्याचे मान्य केल्याने या स्पर्धेला मोठेच साहाय्य मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.