Pune : ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँकेच्या ऑफिसर असोसिएशनच्या वतीने मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर असोसिएशनच्या (Pune) वतीने मुंबई झोन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

Alandi : आळंदी नगरपालिकेत संत गाडगेबाबा जयंती साजरी

यावेळी पंजाब नॅशनल बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर आशिष दास उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेज जवळील डिझायर स्पोर्ट्स क्लब येथे होणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल माने आणि सचिव अमोल तांबे यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.