Chinchwad Bye-Election: भाजपला धडा शिकवा – अॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, पाण्याचा प्रश्न (Chinchwad Bye-Election) जटील झाले आहेत. कुठलाही प्रश्न सुटू शकत नाही असे नसते. फक्त प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती लागते. हे प्रश्न विधानसभेत जोरदारपणे मांडून मार्गी लावण्यासाठी कलाटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ही पोटनिवडणूक 2024 च्या निवडणुकीची सुरुवात आहे. त्यामुळे चिंचवडच्या निवडणुकीत कलाटे यांना निवडून देवून सत्ताधा-यांना धडा शिकवावा, असेही ते म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ अॅड. आंबेडकर यांची रावेत येथे प्रचार सभा झाली. उमेदवार राहुल कलाटे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, अमित गावडे, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे, मीनल यादव, वंचितचे अनिल जाधव, अशोक सोनेने, अमित भुईगळ, प्रा. किसन चव्हाण आदी उपस्थित होते.

अॅड. आंबेडकर म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भाजप संपवत आहे. त्यासाठी कसबा आणि चिंचवडची जागा शिवसेनेला दिली पाहिजे होती. राष्ट्रवादीला उमेदवार द्यायचा होता तर त्यांनी ताकदीचा उमेदवार द्यायला हवा होता. या उमेदवारामुळे भाजपला फायदा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी द्यावी, आम्ही प्रचाराला येतो असे सूचविले होते. मात्र, त्यांना उमेदवारी दिली नाही. याचे गमक आता आम्हाला कळत आहे. राष्ट्रवादीला 2014 च्या निवडणुकीत 40 हजाराच्यावर मते मिळाली नव्हती. त्यामुळे (Chinchwad Bye-Election) त्यांचा उमेदवार ताकदीचा नाही हे दिसून येते. त्यामुळेच आम्ही कलाटे यांना पाठिंबा दिला.

Baner : महिलेविषयी सोशल मिडियावर अश्लील कमेंट

”बेरोजगारी कमी करायची असेल. तर, सरकारचा पैसा सार्वजनिक क्षेत्रामार्फत तरुणांकडे आला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही हाताला काम मिळेल” असे सांगत अॅड. आंबेडकर म्हणाले, ”रशियाकडून आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा 25 डॉलरने कमी आपण क्रूड ऑइल खरेदी करीत आहोत. मात्र आपल्याकडे रोज पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. मग हा निधी जातोय कोठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याचे उत्तर केंद्र सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री होऊ इच्छिणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.

उज्वल योजनेतील घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त भावात मिळत नाही. ते बाजारभावाप्रमाणे घ्यावे लागते. परवडत नाही म्हणून सिलिंडर वापरायचे या लाभार्थी गृहिणीनी बंद केले आहे. हा निधी जातोय कुठे? याचे उत्तर भाजपने द्यावे. हे सरकार फसवे असून मोठी लढाई आपल्याला लढायची आहे”.

”सरकारी मालमत्ता विकल्यावर पैसा कोठे जातो ? ते माहिती नाही. सरकार आपल्याला कंगाल व्यवस्थेकडे घेऊन चालले आहे. यांना धडा शिकविला नाही तर हे काहीही विकतील अशी परिस्थिती आहे. सर्वत्र खासगीकरण चालू आहे. केंद्रातील, राज्यातील सरकारला धडा शिकविण्यासाठी पोटनिवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत कलाटे यांना निवडून देवून सत्ताधा-यांना धडा शिकवा” असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.